रेकी

रेकी म्हणजे अविरत वाहणारी वैश्विक प्रकाश उर्जा. या ऊर्जेशी मानवाचे साधले गेलेले संधान. रेकी ही जपानी विद्या आहे. जपानी भाषेत रे म्हणजे वैशिव आणि की म्हणजे जीवनात उत्साह्वर्धन करणारी शक्ती, युनिव्हर्सल वायलात लाइफ फोर्स एनर्जी, रेकी ही अत्यंत साधी, सोपी आणि नैसर्गिक उपचार पध्दती आहे. या शक्तीचा उपयोग कधीही आणि कु ल्याही परीस्थितीत करता येतो. ज्या क्षणी तुम्ही रेकीचे वाहक होता त्याक्षणी ही उत्साहवर्धक वैश्विक शक्ती स्वतःहून तुमच्या तळहातातून वाहू लागते आणि अनुपम भेट आजन्म तुमच्या जवळ राहते. रेकी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची यथायोग्य काळजी घेते. तुम्ही इतरांवरही उपचार करू शकता.
रेकी उपचार करत असताना रेकी वाहक शरीराच्या ग्रस्त भागावर हाताच्या ओंजळीचा हळुवार स्पर्श करतो. असा स्पर्श केल्यानंतर काही क्षणातच वाहकाच्या हाताला सूक्ष्म संवेदना जाणवू लागते. कोणाला तळहात उष्ण जाणवतील तर कोणाला झिणझिण्या जाणवतील. हीच रेकी वहनाची खूण उपचाराच्या वेळी रेकी स्वतः वाहकाला मार्गदर्शन करते. कोणत्या भागावर किती वेळ स्पर्श केला असता रुग्णास फायदा होईल हे वाहकाला अनुभवाने कळू लागते. मुरलेल्या आजारांना वेळ लागतो. पण अचानक उद्भभवलेल्या दुखण्यापासून त्वरीत आराम मिळतो. रेकी रोगाच्या मुळांवर घाव घालून रोग बरा करते. मानसिक संतुलन साधते. कोणत्याही प्रामाणिक वैद्यकीय तंत्रांना आणि धार्मिक श्रद्धांना कु ेही तडा न जाऊ देता त्यांच्या बरोबरीने कार्यरत होऊन रेकी आपला कार्यभाग साधते.